मुंबई : महानगरपालिकेच्या वुलनमिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेत आयसीएसई मंडळाची दहावीची परीक्षा देणारी ही पहिलीच बॅच होती. शाळेतील ७ विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.२ टक्के व अर्पित यादव या विद्यार्थ्याने ९१.८ टक्के प्राप्त केले आहेत.

महानगरपालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये जी उत्तर विभागात मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल ही ‘आयसीएसई’ मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत आयसीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या शाळेत इयत्ता १० वीचा वर्ग होता. त्यामध्ये एकूण २७ विद्यार्थी इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.०२ टक्के व अर्पित यादव या विद्यार्थ्याने ९१.०८ टकके गुण प्राप्त केले आहेत. मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल आयसीएसई मंडळाच्या शाळेचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल लागल्याने विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांच्या मेहनतीचेही कौतुक केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वुलनमिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेतील दहावीची परीक्षा देणारी ही पहिलीच बॅच असल्यामुळे सर्वांचे लक्ष शाळेच्या निकालाकडे लागले होते. शिक्षकांनीही हे आव्हान स्वीकारून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी संबंधित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती वखारिया आदी उपस्थित होते.