मुंबई : सावंतवाडीतील युवा उद्योजक विशाल परब व रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दोन हजाराहून अधिक स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यालयात या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार डॉ. विनय नातू आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकासाचा नवा अध्याय रचला जात आहे. भाजप सामान्य माणसापर्यंत पोचावा, ही अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली .
प्रशांत यादव यांच्याबरोबर स्वप्ना यादव, शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजय देसाई, दीप्ती महाडिक, मुग्धा जागुष्टे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे, पंचायत समिती माजी सदस्य ऋतुजा पवार, प्रकाश कानसे, शीतल करंबेळे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे ३ माजी सदस्य, पंचायत समितीचे ६ माजी सदस्य, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे)३ विधानसभा क्षेत्राध्यक्ष, १७ सरपंच, १७ माजी सरपंच, १३ उपसरपंच, २४ ग्रामपंचायत सदस्य आदींचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्हयातील कळंब तालुका युवक काँग्रेस सचिव अंकुश कासारकर, दिनेश वडकी, संतोष घोटेकर, हनुमान लोणकर, राजू टेकाम, उपसरपंच अरुण वाघमारे तसेच राज्य वखार महामंडळ कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत गाडीवान यांच्यासह कर्मचारी महासंघाचे महासचिव शंकर जामदार, राजेश नामपल्लीवार, नितीन इद्रे, सूर्यकांत एडलवार आदी पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
शिवसेना ठाणे जिल्हा उपप्रमुखासह अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये
शिवसेना (उद्धव ठाकरे) ठाणे ग्रामीण उप जि.प्रमुख, सदाशिव सासे, माजी जि.प सदस्य, जयश्री सासे, सुवर्णा राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.