27 October 2020

News Flash

Coronavirus : सलग दुसऱ्या दिवशीही हजारावर बाधित

दिवसभरात ३० जणांचा मृत्यू; शहरातील मृत्यूसंख्या चारशे पार

दिवसभरात ३० जणांचा मृत्यू; शहरातील मृत्यूसंख्या चारशे पार

नागपूर : उपराजधानीत दिवसेंदिवस करोनाचा विळखा घट्ट होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी येथील शहर  व ग्रामीण भागात तब्बल १,०९६ नवीन करोनाबधितांची भर पडली असून ३० मृत्यू नोंदवण्यात आले.

गेल्या २४ तासांत मेयो रुग्णालयात तब्बल १२ मृत्यू नोंदवण्यात आले. दगावलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील असून काही रुग्ण नागपूर ग्रामीण तर काही रुग्ण जिल्ह्याबाहेरील  होते. मेडिकलमध्येही हीच स्थिती आहे. त्यामुळे नागपूर शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय मिळून शहरात गेल्या २४ तासांत तब्बल ३० मृत्यू नोंदवण्यात आले. यापैकी २३ मृत्यू नागपूर शहर, ३ मृत्यू नागपूर ग्रामीण आणि ४ मृत्यू नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या थेट ५७९ वर पोहचली आहे. त्यात नागपूर शहरातील ४१७, नागपूर ग्रामीण ९२ तर नागपूर जिल्ह्याबाहेरील ७० मृत्यूंचा समावेश आहे.  नागपुरातील आजपर्यंतच्या बधितांची संख्या थेट १६,७३३ वर पोहचली आहे. यापैकी ४,२१३ रुग्ण नागपूर ग्रामीण तर १२,५२० रुग्ण नागपूर शहरातील आहेत. शहरातील रुग्णांमध्ये २५१ रुग्ण नागपूर जिल्ह्य़ाबाहेरून येथे अत्यवस्थ अवस्थेत उपचार  आले आहेत.

करोनामुक्तांची संख्या साडेसात हजारांच्या उंबरठय़ावर

शहर  व ग्रामीण भागात  दिवसभरात २३३ जण करोनामुक्त झाले. त्यात ग्रामीणच्या ९८, शहरातील १३५ जणांचा समावेश आहे. या नवीन करोनामुक्तांमुळे एकूण संख्या ७,४२९ वर पोहचली आहे. त्यात शहरातील ४,७१२ जण तर ग्रामीणच्या २७१७ जणांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ८ हजार

शहर आणि ग्रामीण भागात सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या प्रथमच ७,९७९ वर पोहचली आहे. त्यात शहरातील बधितांची संख्या ६,५५९  तर ग्रामीणचे १,४२० रुग्ण आहे. एकूण बधितांपैकी ५,२७३ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.  दुपापर्यंत १,०९६ बधितांपर्यंत प्रशासन  पोहचू शकले नव्हते.

१,०९६ बधितांवर रुग्णालयात उपचार

मेडिकलमध्ये सध्या सर्वाधिक ३६७ बधितांवर उपचार सुरू आहे. त्यानंतर मेयोत २९२, एम्समध्ये ४७ तर विविध खासगी आणि कोविड केयर सेंटरमध्ये एकूण १,०९६ जण दाखल आहेत. बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे.  काही रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सर्वाधिक व्हेंटिलेटरवरील रुग्ण मेडिकल आणि मेयोत उपचार घेत आहेत.

दोन पोलीस निरीक्षकांसह १३ जणांना करोना

करोनाची साखळी पोलीस दलातही वाढत असून आता आणखी दोन पोलीस निरीक्षकांसह १३ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. परिमंडळ पाचअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षक व त्यांचा कर्मचारी, शांतीनगर पोलीस ठाण्यामधील पाच कर्मचारी, लकडगंजमधील तीन, सदर पोलीस ठाण्यात व पोलीस मुख्यालयातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. सर्व जण गृह विलगीकरणात आहेत.

मेडिकलमध्ये चार लिपिकही बाधित

मेडिकलमध्ये गेल्या २ दिवसात महाविद्यालय परिसरातील लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांची करोना तपासणी केली गेली. यापैकी ४ ते ५ जण बाधित आढळल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. या सगळ्यांच्या संपर्कातील सर्वाची तपासणी केली जाणार आहे. बाधितांपैकी बहुतांश जणांना एकही लक्षणे नाहीत, हे विशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:08 am

Web Title: 30 people died in one day due to coronavirus in nagpur zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 व्यापाऱ्यांच्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
2 लोकजागर : विद्यापीठीय ‘वाताहत’!
3 आर्थिक अडचणीमुळेच राणे कुटुंबाचा अंत!
Just Now!
X