लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’’मध्ये दमदार वक्तृत्वकलेचे दर्शन; २० स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीत धडक

नागपूर : ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’मध्ये विविध संवेदनशील विषयांवर प्रखर भाष्य करीत विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील दमदार वक्तृत्व कलेचे दर्शन घडवले. नागपूर विभागीय प्राथमिक  फेरीचा निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात २० स्पर्धकांनी विभागीय अंतिम फेरी गाठली.

तरु णाईला विविध विषयांवर विचार मांडण्यासाठी हक्कोचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची नागपूर विभागाची प्राथमिक  फेरी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस उत्साहात पार पडली. सर्व क्षेत्रांचा तरु णाई कि ती सखोल आणि चौफे र विचार क रते, याची प्रचिती देणारी ही स्पर्धा अटीतटीची ठरली. प्राथमिक  फेरीच्या दुसऱ्या दिवशीही स्पर्धक  तयारीनिशी स्पर्धेत उतरले. समोरचा नेमको कोय बोलतोय, याक डे कोन टवकोरू न लक्ष देत, आपण त्यापेक्षा वेगळे कोय मांडू शक तो या दृष्टीनेही त्यांची तयारी क्षणाक्षणाला बदलत होती. नवोदित लेखिका सायली लाखे-पिदडी आणि प्राध्यापक डॉ. अमित झपाटे या दोन्ही वक्तृ त्त्वपटूंनी स्पर्धेचे परीक्षण के ले. या स्पर्धेत विभागीय अंतिम फे रीक रिता २० स्पर्धकोंची निवड क रण्यात आली. विभागीय अंतिम फे री ७ मार्च रोजी होणार आहे.

दीड महिन्यापासून स्पर्धेची तयारी

दीड महिन्यापासून  या स्पर्धेची तयारी करीत आहे. सावकर आणि गांधी समजून घ्यायला नऊ पुस्तके वाचली. यामुळे गांधी, सावरकर कळाले.  या स्पर्धेतील दर्जेदार विषयांमुळे आमच्यात ही वाचनाची आवड निर्माण होत आहे, असे अमरावती येथील ऋतुजा हरणे हिने सांगितले.

स्पर्धा आणि विषय छानच

स्पर्धा आणि विषय फार छान असतात. विचार करायला भाग पाडणारे विषय असल्याने यातून अभ्यास होतो. नवीन गोष्टींची जाणीव होते. तसेच स्पर्धेचा एक दर्जा असल्याने अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असे निवेदिता पुणवटकर हिने सांगितले.

अशा व्यासपीठावरची मजा औरच

स्पर्धेत सहभागी होण्याचे हे तिसरे वर्ष आहे. वर्तमान परिस्थितीशी निगडित विषय असल्याने विचारांना चालना मिळते. अशा व्यासपीठावर मत व्यक्त करण्याची मजाही काही औरच असते, असे नागपुरातील वेदांत चट्टे म्हणाला.

काय म्हणाले पालक?

तरुणांनी अधिकाधिक लाभ घ्यावा

लोकसत्ताचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. अधिकाधिक तरुणांनी याचा लाभ घ्यावा. यातून अवांतर वाचनाची आवड निर्माण होते. लोकसत्ताच्या या व्यासपीठाला अनेक वर्षांपासून बघत असल्याने मुलाला या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी केले, अशी प्रतिक्रिया पालक सुरेश धाबर्डे यांनी दिली.

पाल्यांना अभिव्यक्त होता आले

लोकसत्ताचे हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे. मुले यानिमित्ताने वाचायला लागतात. आमच्या पाल्यांना यानिमित्ताने अभिव्यक्त होण्याची संधी मिळते हे महत्त्वाचे आहे.  मराठी भाषा टिकवण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे, असे अमरावतीमधून मुलीला स्पर्धेसाठी घेऊन आलेल्या संध्या जामकर यांनी सांगितले.

परीक्षक काय म्हणाले ?

अवांतर वाचन करा

लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा ही स्पर्धकांसाठी मोठी पर्वणी आहे. अशा दर्जेदार स्पर्धामध्ये पाठांतरण के लेले भाषण  उत्स्फू र्त असू शक त नाही. परीक्षकांना ते लक्षात येते. वक्तृ त्वात वाणीशिवाय कोहीच नसते. त्यामुळे विषयांना नवीन वळण द्या. जोपर्यंत विचारमंथन क रणार नाही, तोपर्यंत या वक्तृत्वावर पक ड मिळवता येणार नाही. त्यासाठी चांगल्या लोकोंची भाषणे ऐको, अवांतर वाचन करा असा सल्ला परीक्षक  प्राध्यापक डॉ. अमित झपाटे यांनी दिला.

सुरु वात आणि शेवट याचा मेळ साधा

अशा स्पर्धाचा आज अभाव आहे. आपल्या खणखणीत भाषणांनी भारावून टाकणारे वक्ते आज दिसून येत नाही. ही उणीव भरून काढण्याचे काम  वक्ता दशसहस्रेषु हा उपक्रम करीत आहे हे वाखाणण्याजोगे आहे. स्पर्धकांनी अतिशय संवेदनशील विषयाला न्याय दिला. चिंतनशील विषयांवर बोलताना श्रोत्यांना चिंतन करायला लावणारी ही स्पर्धा होती, असे सांगत वक्तृ त्वाची सुरु वात आणि शेवट याचा मेळ साधला आला पाहिजे, असा सल्ला परीक्षक नवोदित लेखिका सायली लाखे-पिदडी यांनी स्पर्धकांना दिला.

स्पर्धक काय म्हणाले ?

या स्पर्धेची संधी सोडत नाही

लोक सत्तामुळे स्वत:मधील वक्तृत्व क लेला वाव देण्याची संधी मिळाली. आमच्याक डे फोरशा स्पर्धा होत नाहीत. झाल्या तरीही राज्यस्तरावरील लोक सत्तासारखे विषय त्यात राहत नाही. त्यामुळे या व्यासपीठावरू न मिळालेली संधी मी क धीच सोडत नाही, असे धीरज ठाकरे या स्पर्धकाने सांगितले.

संधी मिळाल्याचा आनंद

आजवर अनेक  वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतला, पण मराठी भाषेतून बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. मराठीतून बोलण्याचा आनंद वेगळाच होता. लोक सत्ताच्या व्यासपीठाने ही संधी मिळवून दिला याचा आनंद आहे, असे चंद्रपूर येथील स्वाती मेश्राम हिने सांगितले.

मराठी स्पर्धकांचे हक्काचे व्यासपीठ 

आजकाल महाविद्यालयांमध्येही मराठी बोलायला मिळत नाही. त्यामुळे मातृभाषेवर सर्वच स्तरातून अन्याय सुरू आहे. त्यात लोकसत्ताच्या स्पर्धेमुळे मराठीचे वाचन, चिंतन होते. मराठी स्पर्धकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे, असे प्रदुंभ ठुंबरे या स्पर्धकाने सांगितले.

दुसऱ्या दिवशीही उत्साह कायम

उन्हाची तमा न बाळगता ‘ लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या नागपूर विभागातील प्राथमिक  फे रीत दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा उत्साह कोयम होता. अनेक विद्यापीठांच्या परीक्षा सुरू आहेत.  काही मुलांच्या तोंडी परीक्षा दोन दिवसांवर आल्या आहेत. असे असतानाही लोकसत्ताच्या व्यासपीठाची वर्षभरापासून वाट बघत असल्याचे  विद्यार्थ्यांनी सांगितले. मुली किं वा महिलांबाबतचा विषय म्हटला तर त्यांचीच बाजू घेतली जाणार हे निश्चित असते. मात्र, या स्पर्धेतील अनेक विद्यार्थ्यांनी ‘निर्भया आणि नंतर’ या विषयावर बोलत स्त्रियांच्या सुरक्षेवर कठोर भाष्य केले.  आज दुसऱ्या दिवशी ‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’ या विषयावर बोलताना खरे गांधी आणि सावरकर राजकारणी लोक जनतेला कळूच देत नाही, असा आक्षेप काहींनी घेतला. अशा महापुरुषांचा केवळ राजकारणापुरता वापर करून जनतेची फसवणूक केली जात असल्याचे भाष्यही काही वक्त्यांनी केले. कोही अगदी गांभीर्याने तर कोहींनी ‘स्टायलिश’ अंदाजात व्यासपीठावर प्रवेश के ला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेचा आनंद विद्यार्थ्यांनी मनापासून लुटला.

विभागीय अंतिम

फेरीचे विषय

१- काश्मीरची जमीन आपलीच

२- महाविकासाची युती

३- विराट प्रश्न

४- मंदिरातला राम

प्रायोजक..

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर होत आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च हे आहेत.