जिल्ह्यात २४ तासांत ३ मृत्यू; ४६ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर ४६ नवीन रुग्ण आढळले. सलग तिसऱ्या दिवशी ग्रामीणला एकही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरात २४ तासांत २, ग्रामीणला ०, जिल्ह्याबाहेरील १ अशा एकूण  ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या ५ हजार २९०, ग्रामीण २ हजार ३०५, जिल्ह्याबाहेरील १ हजार ४१५ अशी एकूण जिल्ह्यात ९ हजार १० रुग्णांवर पोहोचली. शहरात दिवसभरात २८, ग्रामीणला १७, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण  ४६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ३२ हजार १७२, ग्रामीण १ लाख ४२ हजार ७२२, जिल्ह्याबाहेरील १ हजार ५९७ अशी एकूण ४ लाख ७६ हजार ४९१ रुग्णांवर पोहोचली. दिवसभरात शहरात २१०, ग्रामीणला ७१ असे एकूण जिल्ह्यात २८१ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख २६ हजार ९६, ग्रामीण १ लाख ३९ हजार ८५३ अशी एकूण ४ लाख ६५ हजार ९४९ रुग्णांवर पोहोचली. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे.

विदर्भात १९ मृत्यू; ३२५ नवीन रुग्ण

विदर्भातील तीन जिल्ह्यात २४ तासांत करोनाचा एकही मृत्यू झाला नसून तीन जिल्ह्यात केवळ १ मृत्यूची नोंद आहे. यासह येथे एकूण १९ मृत्यूंसह नवीन ३२५ रुग्ण नोंदवले गेले आहेत.नागपूर शहरात २४ तासात २, ग्रामीण शून्य, जिल्ह्याबाहेरील १ अशा एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात दिवसभरात ४६ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्यातील १५.७८ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत ४ मृत्यू तर ४५ नवीन रुग्ण, चंद्रपूरला ५ मृत्यू तर ५८ रुग्ण, गडचिरोलीत ० मृत्यू तर १३ रुग्ण, यवतमाळला १ मृत्यू तर १३ रुग्ण, भंडाऱ्यात शून्य मृत्यू तर ५ रुग्ण, गोंदियात शून्य मृत्यू तर ३ रुग्ण, वाशीमला १ मृत्यू तर २७ रुग्ण, अकोल्यात २ मृत्यू तर ६३ रुग्ण, बुलढाण्यात १ मृत्यू तर ३५ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात २ मृत्यू तर १७ नवीन रुग्ण आढळले.

‘म्युकरमायकोसिस’ बळींची संख्या १३१

नागपूर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे नवीन रुग्ण आढळण्यासह मृत्यूचे सत्रही कायम आहे. मंगळवारी २४ तासांत जिल्ह्यात २ रुग्णांचा मृत्यू तर १८ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या १३१ तर रुग्णसंख्या १ हजार ४१८ रुग्णांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात २४ तासांत दगावणाऱ्या २ रुग्णांमध्ये एक शासकीय तर एक खासगी रुग्णालयांत दगावला. शासकीय व खासगी अशा दोन्ही रुग्णालयांत मंगळवारी प्रत्येकी ९ रुग्ण आढळले.  जिल्ह्यात या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांतील  २६, खासगीच्या १०५ अशा एकूण १३१ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शासकीय रुग्णालयांत ४७१ तर खासगी रुग्णालयांत ९४७ असे एकूण १ हजार ४१८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांपैकी २७८ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत तर ७३७ रुग्णांवर खासगी रुग्णालयांत अशा एकूण १ हजार १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर शासकीय रुग्णालयांतून १६३, खासगी रुग्णालयांतून ६७० अशा एकूण ८३३ रुग्णांना  सुट्टी देण्यात आली. सध्या शासकीय रुग्णालयांत २८१, खासगी रुग्णालयांत १७३ अशा एकूण ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयातील रुग्णसंख्या तीनशेहून खाली

शहरात १ हजार ३७२, ग्रामीणला १६० असे एकूण १ हजार ५३२  उपचाराधीन  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील २७६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर १ हजार २५६ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

ग्रामीणला २,४२० चाचण्या

शहरात दिवसभऱ्यात ५ हजार ३९८, ग्रामीणला २ हजार ४२० अशा एकूण ७ हजार ८१८  चाचण्या झाल्या. ही संख्या जिल्ह्यात सोमवारी ६ हजार ९२९ इतकी होती.