मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी अभीष्टचिंतन केले. तत्पूर्वी फडणवीस यांनी गडकरींच्या जन्मदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटनही केले.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यावर गडकरी विरुद्ध फडणवीस असे दोन गट भाजपमध्ये निर्माण झाले. या दोन्ही नेत्यांनी पक्षात गटबाजी नाही असे वारंवार स्पष्ट केले असले तरी कामकाजातून मात्र ती प्रतिबिंबीत होत आली. फडणवीस शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास गडकरी वाडय़ावर पोहोचले.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2016 रोजी प्रकाशित
अभिष्टचिंतनासाठी फडणवीस गडकरी वाडय़ावर
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यावर गडकरी विरुद्ध फडणवीस असे दोन गट भाजपमध्ये निर्माण झाले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-05-2016 at 02:33 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis nitin gadkari