13 August 2020

News Flash

नागपूर विभागातील पाच लोकांकिका उपान्त्य फेरीत

भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढय़ातील स्त्रियांचे योगदान कमी असले तरी महत्त्वपूर्ण, हेही साऱ्यांनाच ठावूक.

भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढय़ातील स्त्रियांचे योगदान कमी असले तरी महत्त्वपूर्ण, हेही साऱ्यांनाच ठावूक. ब्रिटिशांविरुद्धचा हा लढा आणि त्यातील स्त्रियांचे योगदान व त्यासाठी तिला घरून होणारा विरोध ‘जननी जन्मभूमिश्च’ या नाटकातून अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थी कलावंतांनी साकारला. तेजस्विनी आणि तिच्या आजीतील हा मतांचा विरोधाभास परीक्षकांना दखल घेण्यास भाग पाडणारा ठरला.

विषय सर्वाना माहिती असलेलाच, पण त्याच्या मांडणीत वेगळेपण आणण्यात अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची चमू यशस्वी ठरली. काही विषय नाविन्यपूर्ण, तर काही विषय जुनेच, पण नव्याने मांडणी करून विद्यार्थी कलावंतांनी लोकसत्ता लोकांकिकांच्या प्राथमिक फेरीचा तिसरा दिवस गाजवला. अकोला आणि अमरावतीच्या महाविद्यालयांनी सादर केलेल्या नाटकांनी वातावरण निर्मिती केली. तीन दिवस पार पडलेल्या प्राथमिक फेरीत तब्बल २९ महाविद्यालये सहभागी झाली. यातील ५ एकांकिकाअतिशय उत्कृष्ट ठरल्या. आता उपान्त्य फेरी ७ ऑक्टोबरला होणार आहे. रेल्वेचा प्लॅटफॉर्म म्हणजे कितीतरी नव्या कथांना जन्म देणारा.. रेल्वेची वाट बघत असताना आपल्या आजूबाजूलाच या कथा जन्म घेत असतात.. अशाच एका कथेची मांडणी अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘प्लॅटफॉर्म’ या एकांकिकेतून मांडली. रात्रपाळी मुलींनी करायचीच नाही, असाच समज अजूनही अनेक घरांमध्ये आहे. त्यातही हॉटेलमधील नोकरी म्हणजे नकोच. अशा वेळी तीन मैत्रिणी हॉटेलमध्ये दिवसा आणि रात्रपाळीही करतात. त्याच हॉटेलमधील एका खोलीत एकत्र राहतात, पण एका रात्री असे काही घडते की, नेहमीसारखा दिवस उगवूनही त्यांच्यासाठी तो नेहमीसारखा नसतो. मालक आणि कर्मचाऱ्यातील नाते त्यांची मुले मोडून काढतात. कर्मचाऱ्याच्या मुलीने न अनुभवलेले सुख मालकाचा मुलगा तिला देतो आणि त्यांची गुंतागुंत नात्यांच्या मर्यादेपलीकडे जाते. तो तिला दगा देत नाही, तर तो ते जग सोडून जातो, पण त्याचा अंश तिच्या पोटात असतो. या परिस्थितीत काय करायचे, हा तिच्या आईला पडलेला प्रश्न या एकांकिकेतून उत्कृष्टरीत्या मांडला. खासगी रुग्णालयात घडणारे प्रकार आता सरकारी रुग्णालयातही घडायला लागले. खासगी रुग्णालयात फी, तर सरकारी रुग्णालयात पावती, एवढाच काय तो फरक. लोकसत्ता लोकांकिका नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी महालमधील दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत पार पडली. तिन्ही दिवस पार पडलेल्या प्राथमिक फेरीतील २९ नाटकांचे परीक्षण नरेश गडेकर आणि श्रीदेवी प्रकाश देवा यांनी केले. टॅलेन्ट पार्टनर म्हणून आयरिश प्रॉडक्शनच्या अभिजीत गुरू व समिधा गुरू यांनीही सुरुवातीचे दोन दिवस विद्यार्थी कलावंतांना अभिनयातील बारकावे सांगितले. या स्पध्रेसाठी स्टडी सर्कलची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी नक्षत्र काम  सांभाळत आहेत.

विदर्भात कलावंत भरपूर पण -वीरा साथीदार

एकांकिका स्पर्धा अभिनयगुण हेरण्याचे मोलाचे काम करतात. विदर्भात कलावंत भरपूर आहेत, पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. लोकांकिकाने ते व्यासपीठ मिळवून दिले. यातील अखेरचे नाटक गहिवरून टाकणारे ठरले.

प्राथमिक फेरीचा निकाल

१) अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज, चिखली – ‘ऊलगुलान’

२) शिवाजी सायन्स कॉलेज, अमरावती – ‘जननी जन्मभुमिश्च’

३) विठ्ठलराव खोब्रागडे बी.एड. कॉलेज – ‘तू जिंदा है’

४) महिला महाविद्यालय, नागपूर – ‘नाटक बसलं’

५) विठ्ठलराव खोब्रागडे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागपूर – ‘विश्वनटी’

आज मुंबई, नाशिक  आणि पुण्यात.. 

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहा-विद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी मुंबई, पुणे व नाशिक येथे होणार आहे.   मुंबईतील प्राथमिक फेरी रवींद्र नाटय़ मंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत होईल. तर नाशिकमधील फेरी महाकवी कालिदास कला मंदिरात होईल. पुण्यातील प्राथमिक फेरी नूमवि मुलींची शाळा येथे होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2015 4:41 am

Web Title: five one act play from nagpur division reached in semifinal
Next Stories
1 धार्मिक पिळवणुकीतून दहशतवाद फोफावतो
2 ‘पेसा’, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
3 वीज पडून राज्यात अकरा जण ठार
Just Now!
X