नागपूर : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने डॉक्टरांकडे नेल्यानंतर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या पालकांना धक्का बसला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित १६ वर्षीय मुलगी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे आईवडील शेतमजूर आहेत.

रविवारी अचानक पोट दुखायला लागले. त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. मात्र, आईचा विश्वास बसेना. त्यामुळे तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी तपासणी करून गर्भवती असल्याचे निदान करून पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. शिक्षण घेत असलेली मुलगी गर्भवती असल्याचे ऐकून आईला धक्का बसला. मुलीला घरी आणल्यानंतर विचारले. परंतु, मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला. प्रियकराचे नाव सांगण्यास मुलगी तयार नव्हती.

हेही वाचा : अमरावती : …तर कृषी धोरणातही बदल करणार; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची मेळघाटात ग्वाही

आम्ही दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगून प्रियकराचे नाव सांगणार नसल्याचे मुलीने आईला सांगितले. सूत्राच्या माहितीनुसार, मुलगी दहावीत असतानाच एका युवकासोबत मैत्री झाली होती. दोघांचे सूत जुळले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळा सुटल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या. गेल्या १ एप्रिल रोजी दोघांनी घरी कुणी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही वारंवार घरी कुणी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते. त्यातून मुलगी गर्भवती झाली. परंतु, पहिले दोन महिने मुलीच्या लक्षात आले नाही.

अमरावती : कृषीमंत्री मेळघाट दौऱ्यावर असतानाच शेतकऱ्याने केली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्भवती असल्याची माहीत झाल्यानंतर ती घाबरली. परंतु, काय करावे? कुणाला सांगावे ?, घरी बदनामी होईल, अशी भीती मनात असताना मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. चार महिने झाल्यानंतर मुलीला उलट्या व्हायला लागल्या आणि पोट दुखायला लागल्याने आईच्या लक्षात हा प्रकार आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या युवकाचे नाव सांगण्यासाठी मुलीची पोलीस विचारपूस करीत आहेत. सध्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.