नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच होणार आहे. इयत्ता दहावीच्या निकालाला जून उजडणार असला तरी बारावीचा निकाल मात्र २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) आयसीएसई आणि आयएससीच्या निकालानंतर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार, याकडे लागले आहे. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळातर्फे यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली.

हेही वाचा >>>गोंदिया : दोन चालकांच्या भांडणात ट्रेलर सुटला अन् थेट खासदाराच्या वाहनाला धडकला; पुढे काय झाले वाचा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परीक्षेसाठी राज्यातील १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत झाली असून या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.