बुलढाणा: समृद्धी आणि वाहन अपघात असे जणू काही समीकरणच तयार झाले आहे. यातील अनेक अपघात चालकाला लागणाऱ्या डुलकी मुळे होतात, असे नेहमीचे चित्र आहे. हिंदुहृह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती मार्गावरील अपघातांची विशेषतः चालकांच्या डुलकीमुळे होणाऱ्या अपघातांची दुर्दैवी अन तितकीच चिंता जनक मालिका चालू वर्षातही कायम आहे.
शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात नेमके हेच झाले. चालकाची डुलकी दोघांचा जीव घेणारी आणि चौघाना जायबंदी करणारी ठरली. हे सर्व जण वाशीम येथील चंदनशिव परिवारातील आहे. गुरुवारी उत्तर रात्री ३ वाजताच्या सुमारास समृद्धी वरील नागपूर कॉरीडोर वरील चॅनेल क्रमांक २६८+६०० नजीक ही भीषण दुर्घटना घडली.
वाशीम येथील हे रहिवासी
ईरटीका कारने (क्रमांक एम एच -११ ८५६६) पुणे येथून वाशीम ला जात होते. पहाटे चालक शिवाजी इडोळे (वय २७ राहणार वाशिम ) याला डुलकी लागली. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन समोर चालत असलेल्या ट्रक (क्रमांक आर जे २९ जीबी २८२० याला कार वेगाने धडकले.
रतन चंदनशीव (वय ७० वर्ष), गोपाळ रतन चंदनशीव वय ३२) दोन्ही राहणार वाशिम हे जागीच ठार झाले . ते पिता पुत्र होते. पूजा रतन चंदनचिव वय २९ वर्ष, राणी गोपाल चंदनचिव वय ३१ वर्ष दोघी गंभीर झाल्या असून अर्चना रतन चंदनचिव वय ६८वर्ष हे जखमी झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हवालदार मुकेश जाधव, विष्णू गोलांडे व निवृत्ती सानप घटना स्थळी दाखल झाले. जखमी व मृतक यांना ग्रामीण रुग्णालय मेहेकर येथे १०८ ॲम्बुलन्स डॉक्टर वैभव बोराडे व चालक पडघान यांच्यासह रवाना केले अपघात ग्रस्त वाहन मेहकरच्या जलद कृती दलाने क्रेनच्या साह्याने बाजूला केले. यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली अपघात घटनास्थळी डोणगाव पोलीस देखील हजर झाले.