लोकसत्ता टीम
यवतमाळ : महावितरणच्या आर्णी उपविभागाने तालुक्यातील चिखली आणि देउरवाडी येथील २२ जणांवर वीज चोरीची कारवाई करत ५ लाख २१ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. संबधित वीज चोरी प्रकरणी दंड आणि वीज चोरीची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
आणखी वाचा-स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती, या पदांसाठी असा भरा अर्ज…
वीज चोरी करताना पकडले गेल्यास विद्युत कायदा २००३ च्या तरतुदीस अधीन राहून कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. पहिल्यांदा तडजोडपोटी आर्थिक स्वरूपातील दंड आकारला जातो; तर दुसऱ्यांदा कारवाई झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल होतो.शिवाय कायद्यात तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. आर्णी तालुक्यातील सर्वच गावात यापुढे उपकार्यकारी अभियंता आकस्मिक आणि सतत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.