जिल्हय़ात ११ मृत्यू, ३६५ नवे रुग्ण 

नागपूर : दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या घटत असून मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. शुक्रवारी एकूण १६  हजारांवर चाचण्या झाल्या. त्यात  ३६५ नवे रुग्ण आढळले. चाचण्यांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या खूपच कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९६.४२ वर गेले आहे.

शुक्रवारी जिल्’ात ११ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ शहरातील, २ ग्रामीणचे तर ३ जिल्हय़ाबाहेरील आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ८ हजार ८६५ वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरात ३६५ नवे करोना रुग्ण आढळले. यामध्ये २१६ शहरातील १४६ ग्रामीणचे तर ३ जिल्हय़ाबाहेरील आहेत. १६ हजार १५१ नवीन चाचण्या झाल्या. यामध्ये ११ हजार ६२९ शहरातील तर ४ हजार ५२२ ग्रामीणमधील आहेत.  या चाचण्याच्या तुलनेत रुग्णसंख्या अल्प आहे. शुक्रवारी १ हजार ३३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ६०९ शहरातील तर ७२४ ग्रामीणचे आहेत.

विदर्भात ६९ रुग्णांचा बळी 

शुक्रवारी विदर्भात करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ६९ इतकी होती. दिवसभरात नागपुरात ११ रुग्णांचा बळी गेला तर ३६५ नवे रुग्ण आढळले. अमरावतीमध्ये १३ मृत्यू ४९६ नवे रुग्ण आढळले.  वध्रेत ८ मृत्यू व १९२ बाधित, यवतमाळ ८ मृत्यू, ११८ बाधित, भंडारा जिल्ह्य़ात २ मृत्यू व १०१ नवे रुग्ण, गोंदियात १ मृत्यू तर २५ नवे रुग्ण, वाशीम ६ मृत्यू तर २०५ नवे बाधित, अकोला ९ मृत्यू तर २७० नवे रुग्ण, बुलढाणा १  मृत्यू तर २७९ नवे रुग्ण, चंद्रपूर ७ मृत्यू १८७ नवे रुग्ण, गडचिरोलीत ३ मृत्यू १०८ नवे रुग्ण,आढळले.