नागपूर: पक्षीमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथील बर्ड सॉंग या संस्थेच्या यजमानपदाखाली, नवभारत शिक्षण मंडळाचे शांतिनिकेतन लोक विद्यापीठ संकुल, सांगली येथे दि. २३ आणि २४ डिसेंबर २०२३ दरम्यान होत आहे.

हेही वाचा… संभाजी भिडेंविरोधात विजय वडेट्टीवार यांची पोलिसांत तक्रार; चंद्रपुरातही काँग्रेस आक्रमक

या संमेलनाच्या एक दिवस आधी दिनांक २२ डिसेंबर रोजी ‘पक्ष्यांचे आवाज’ या विषयावरील पहिली राष्ट्रीय स्तरावरील परिषद सुद्धा आयोजित केली जाणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ वन्यजीव अभ्यासक अजित उर्फ पापा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पापा पाटील यांनी मानद वन्यजीव रक्षक सांगली म्हणून काम केले असून, राज्याच्या वन्यजीव मंडळावर सुद्धा सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

हेही वाचा… महात्मा फुलेंसंदर्भात संभाजी भिडेंचा ‘यू टर्न’; अमरावतीमध्ये टीका अन् अकोल्यात अभिवादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणी तर्फे अजित उर्फ पापा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.