नागपूर : भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट महिन्यात देशभरात पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवली होती. महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरीच्या ५३ टक्के तूट नोंदवली गेली.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि नागलँड ही राज्ये वगळता उर्वरित राज्यांत पावसाची तूट नोंदवली गेली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेश, ओडिशा येथे तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला.

हेही वाचा – नागपूरच्या प्रसिद्ध ऊर्सचे यंदा १०१ वे वर्ष, १६ लाख भाविक येण्याचा अंदाज, काय आहे नियोजन ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, नागालँड या राज्यांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, दिल्ली येथे सरासरीच्या श्रेणीत पावसाची नोंद झाली. उर्वरित भारतात जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, बिहार, मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोराम, महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाची तूट २० ते ५९ टक्क्यांदरम्यान आहे.

हेही वाचा – नागपुरात लवकरच ट्रॉली बस सेवा, शहराच्या चार भागांना जोडणार

हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तूट ही ६० टक्क्यांहूनही अधिक आहे.