भंडारा : सायंकाळच्या सुमारास एक भले मोठे अस्वल न्यायालय वसाहत परिसरात शिरले. परिसरात फेरफटका मारत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या दिशेने ते अस्वल धावू लागले. अगदी १५ फूट अंतरावर अस्वल आले तोच त्यांनी घराच्या दिशेने धूम ठोकली आणि कसाबसा जीव वाचवला. लाखांदूर येथील दिवाणी न्यायालयाच्या कर्मचारी वसाहतींत अस्वल दिसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी न्यायालयीन वसाहतीत राहणारे लिपिक के. ए. रहिले सदनिकेच्या आवारात उभे असताना अचानक एक भले मोठे अस्वल समोरून धावत येत असल्याचे त्यांना दिसले. अगदी दहा ते पंधरा फूट अंतरावर असलेले अस्वल पाहून त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी बचावासाठी लगेच घराकडे धाव घेतली व याबाबत दिवाणी न्यायाधीश पी. एन. कोकाटे यांना माहिती दिली. त्यांनी भ्रमनध्वनीवरून वनविभाग व पोलिसांना कळविले. पोलीस व वनकर्मचारी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत अस्वल सुरक्षा भिंतीवर चढून लागून असलेल्या झुडपात निघून गेले. अस्वल तेथूनही निघून जावे म्हणून वनविभाकडून फटाके फोडण्यात आले.

हेही वाचा >>> नागपुरात ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’!, केंद्राची कंपनी आणि ‘एमआयडीसी’ करणार अभ्यास

ही वसाहत शहरापासून दूर  असल्याने या परिसरात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे थोडा अंधार झाला तरी, कर्मचारी व कुटुंबीयांचे बाहेर पडणे कठीण झाले आहे. सकाळी फिरायला जाणेही टाळले जाते. अस्वलाच्या घुसखोरीने कर्मचाऱ्यात भीती निर्माण झाली आहे. सुरक्षा भिंतीची उंची वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या भागात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने अस्वल मोहाच्या शोधात आले असावे, असे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bear enter in court colony in the area of employees families in fear ksn 82 ysh
First published on: 20-02-2023 at 09:27 IST