जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा तस्करीचे मध्यप्रदेश मोठे आणि मुख्य केंद्र असल्याचे पोलिसांच्या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बुलढाणा पोलिसांनी मेहकरजवळ एक अवैध गुटखा वाहतूक करणारी मालमोटार पकडली. यामधील ३५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
गुटखाबंदी असली तरी शहरासह जिल्ह्यात ‘मालाची’ कधीच कमतरता नसते. गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून गुटख्याचा पुरवठा करण्यात येतो, हे लपून राहिलेले नाही. मध्यप्रदेशातून आलेला मोठा साठा जप्त करण्यात आल्याने ही सुनियोजित तस्करी पुन्हा प्रकाशात आली आहे.

कल्याणमध्ये पोलिसांचा खबरी म्हणून तरुणाला बेदम मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाणा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मेहकरजवळ एक अवैध गुटखा वाहतूक करणारी मालमोटर पाठलाग करून पकडली. मालमोटारीतून ३५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. ही मालमोटार मध्यप्रदेशातून बुलढाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून मेहकर शहरानजीक वाहन पकडले