उपराजधानीत श्वानांना जाणूनबुजून मारण्याचे, वाहनाने फरफटत नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. श्वानांना बोलता येत नसले तरी त्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संघटना मा़त्र पुढे सरसावल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात आहेत. असाच एक गुन्हा शुक्रवारी नोंदवण्यात आला.

हेही वाचा- अकोला : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील एका वाहनचालकाने रस्त्यावरुन जाणाऱ्या श्वानाच्या अंगावर जाणूनबूजून वाहन नेले. श्वान वाहनाखाली आल्यानंतरही त्याने कोणताही पश्चाताप दाखवला नाही. श्वानांना मारुन टाका, असे सांगून तो निघून गेला. या घटनेची ध्वनीचित्रफित समोर येताच श्वानप्रेमींनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या वाहनचालकाविरुद्ध आयपीसी कलम ४२८ आणि पीसीए कायदा कलम ११(१)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला. माणसांना जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच तो प्राण्यांना देखील आहे. पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरतेची प्रकरणे गांभीर्याने घेतली पाहीजे. या वाहनचालकाविरुद्ध तपास करुन गुन्हा नोंदवल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले. जो कोणी प्राण्यांना इजा करेल, त्याला शिक्षा होईल. प्राणी क्रुरता कायद्यान्वये गुन्हा नोंदवला जाईल.