नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक रमेशराव इंगळे (रा. मानकापूर) यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनीसुद्धा आता विशेष पथके तयार करून आरोपी प्रशांत कोरटकर याचा कसून शोध घेणे सुरू केले आहे.

कोल्हापूर पोलिसांनी तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्या नेतृत्वातील एक पथक प्रशांत कोरटकर याला अटक करण्यासाठी नागपुरात दोन दिवसापूर्वी दाखल झाले आहे. मात्र प्रशांत कोरटकर हा नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. प्रशांत कोरटकर यांच्या विषयी माहिती काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस कोतवाली, महाल, सदर या भागात छापे घालत आहेत. ‘स्मार्ट पोलिसिंग’साठी ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेला सुद्धा अद्याप प्रशांत कोरडकर बाबत कोणताही सुगावा लागलेला नाही हे विशेष. कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नागपुरात नागरिक कृती समितीचे सदस्य दीपक इंगळे यांनी राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या सूचनेनुसार बेलतरोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. प्राप्त तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम १५१, १९६, २९९, ३०२, ३५२ नुसार गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोरटकरला अटक न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरवर अटक करा, अन्यथा या प्रकरणाच्या विरोधात शिवभक्तांच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांनी दिला.