नागपूर : गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणामध्ये राज्यात नव्या संस्थांची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला असताना प्लेसमेंटमध्ये मात्र, राज्याचा आकडा सातत्याने माघारत चालल्याचे दिसते. विशेष म्हणजे, गेल्या २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षीत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्लेसमेंटमध्ये वीस हजारांची घट नोंदविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

तर दुसरीकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे. यंदा विविध कंपन्या आयआयटीमध्ये आल्या. परंतु त्यांच्याकडील नोकरीच्या ऑफर ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. जुन्या आयआयटी दिल्ली, बॉम्बे, कानपूर, मद्रास, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी आणि वाराणसी (बीएचयू) या धक्कादायक ट्रेंडमुळे अडचणीत आहे.

हेही वाचा >>>‘या’ पदभरती प्रक्रियेतही घोळ? प्रतीक्षा यादीसह काही नावे…

बघा प्लेसमेंटची स्थिती काय आहे?

– राज्यातील अभियांत्रिकीसह, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन, एमसीए, फार्मसी आणि अप्लाईड आर्ट ॲण्ड क्राफ्ट या अभ्यासक्रमातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचा प्रश्‍न कायम आहे.

– गेल्यावर्षी राज्यात ३ लाख ५३ हजार १३४ जागांवर २ लाख ९२ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

– त्यापैकी १ लाख २७ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, यापैकी १ लाख ५ हजार ५८४ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले.

– सुमारे २२ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले नसल्याचे दिसून येते.

– प्लेसमेंटची संख्या २०२१-२२ च्या तुलनेत ४ हजारांने कमी असल्याचे चित्र आहे. २०२३-२४ या वर्षांत या संख्येत भरीव वाढ झाल्याचे दिसत नाही.

– IIT मध्ये प्लेसमेंट ३० टक्क्यांनी झाली कमी, नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले.

हेही वाचा >>>माकडचाळे… महिलेची पर्स बंधाऱ्यात फेकली, २१ हजारासह सोन्याची पोतही वाहून गेली

कमी विद्यार्थ्यांना नोकऱ्या

आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जिथे गेल्या वर्षी कंपन्या ८ ते १० मुलांना नोकऱ्या देत होत्या, आता फक्त १ ते २ विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या देत आहेत. आयआयटीमध्ये अंतिम प्लेसमेंट सत्र १ डिसेंबरपासून सुरू झाले. प्लेसमेंट सेल आता अधिक कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत IIT खरगपूरला फक्त ११८१ ऑफर मिळाल्या आहेत आणि IIT BHU ला फक्त ८५० ऑफर मिळाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआयटी प्लेसमेंट ट्रेंड ठरवते

जुन्या आयआयटी या ट्रेंडमुळे आश्चर्यचकित होतात, कारण दरवर्षी या संस्था संपूर्ण देशासाठी प्लेसमेंट मानके ठरवतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या प्रतिष्ठित संस्थांमध्ये जाण्यासाठी कठोर संघर्ष करतात, जेणेकरून त्यांना चांगल्या नोकऱ्या आणि चांगले जीवन मिळावे.