नागपूर : एका मद्यधुंद कारचालक डॉक्टर तरुणीने एका दुचाकीचालकाला धडक दिल्यानंतर त्याच्यासोबत वाद घालून रस्त्यावर गोंधळ घातला. त्यानंतर तिने पोलिसांशीसुध्दा वाद घातला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी त्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरुणीच्या गोंधळामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. त्या तरुणीच्या गोंधळाची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. डॉ. क्षिप्रा (२५) असे आरोपी तरुणीचे नाव असून ती एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिकत आहे.

कोतवालीतील रामकुलर चौकात डॉ. क्षिप्रा ही शनिवारी सकाळी अकरा वाजता मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होती. रामकुलर चौकात क्षिप्राने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकी चालक निकिलेश ठाकरे याने दुचाकीच्या झालेल्या नुकसानाबाबत विचारणा केली. मात्र, क्षिप्राने त्याला शिवीगाळ करीत उलट कारचे नुकसान झाल्याचा दावा केला. तिने रस्त्यावर उतरुन गोंधळ घालून त्या निकिलेशला पैशांची मागणी केली. या वादात काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिने नागरिकांनाही दम दिला.

काही वेळातच तेथे कोतवाली पोलीस पोहचले. त्यांनी तरुणीला कारमधून बाहेर निघण्यास बजावले. मात्र, तिने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिची वैद्यकीय चाचणी केली. ती मध्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कोतवाली पोलिसांनी डॉ. क्षिप्रा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिच्या पालकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. डॉ. क्षिप्राला गोंधळ घालताना अनेकांनी मोबाईलने तिची चित्रफित बनवली आणि समाजमाध्यमांवर प्रसारित केली.

पोलिसांनाही जुमानली नाही

चूक असताना सुध्दा शितलने त्याच्या दुचाकीची चावी घेतली. तो चावी मागण्यासाठी विनवनी करीत होता. मात्र, आधी माझ्या कारची नुकसान भरपाई दे नंतर चावी देतो. अशी तिने भ्ूामिका घेतली. दरम्यान पोलिस आले. त्यांनी तिला कारमधून उतरण्यास म्हटले. त्यांनाही ती जुमानत नव्हती. अखेर महिला अधिकारी आल्यानंतर तिला ठाण्यात आणण्यात आले.

अहो त्याला लाज वाटते काय?

मी राँग साईड आहे काय? आधी ते बघा. असे निखिलेशने म्हणताच ती भडकली. तो बालला कसा काय? अहो त्याला लाज वाटते काय? नंतर नागरिकांच्या गर्दीतून पोलिसांना बोलवा हा एकच सूर होता. अहो मी पण गरीब आहे. गरीबाचीच मुलगी आहे, असे ती शांतपणे सांगत होती.