नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. येथे गुरुवारी रात्री एका प्रवाशाचा खून झाला. यापूर्वी एका प्रवाशाच्या नातेवाईकाने बॅटरी कार चालकाला तलवार दाखवून धमकावले होते.

हेही वाचा – “महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचं जंगलराज, झेपत नसेल तर सत्ता सोडा”, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून नाना पटोले कडाडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस शिपाई रात्री गस्तीवर असताना त्यांना फलाट क्रमांक ५ वर पहाटे पावणे तीनच्या सुमारास एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. मृताच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. या घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये मृत व्यक्तीला एक इसम मारत असताना दिसून आले. लागलीच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित इसमाचा शोध घेण्यात आला. तो दडून बसला होता. त्याचे नाव दिनसागर ऊर्फ दिनेश धोंडिबा सदाफुले असून तो वारजे माळवाडी रामनगर, पुणे येथील रहिवासी आहे. त्याचा मृत जितेंद्र ऊर्फ टोपी (छत्तीसगढ ) याच्याशी वाद झाला. या वादातून त्याने त्याच्या डोक्यावर सिमेंटचा मोठा ठोकळा मारला. गंभीर दुखापत झाल्याने जितेंद्र याचा जागीच मृत्यू झाला.