नागपूर : मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशाचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. देवानंद तिवारी असे मृताचे नाव आहे.

देवानंद आपल्या मुलासह मुंबईहून रांचीला जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीज आणि क्षयरोग ग्रस्त ६२ वर्षीय देवानंद तिवारी यांना विमानात चढल्यानंतर काही वेळातच रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. वैद्यकीय सेवा मिळण्यापूर्वीच त्यांचा विमानातच मृत्यू झाल्याचे समजते.

हेही वाचा – १४ वर्षांनंतरही वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाचे काम रखडलेलेच; विद्युतीकरणाची अद्याप निविदा नाही

हेही वाचा – धक्कादायक! राज्यात ११ लाख ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैमानिकाने नागपूर विमानतळावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास वैद्यकीय आपातकाली स्थितीत विमान उतरवण्याची परवानगी मागितली. प्रवाशाला विमानतळावरून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, देवानंदचा मृत्यू जास्त रक्ताच्या उलट्यांमुळे झाला. सोमवारी संध्याकाळी ६.१९ च्या सुमारास मुंबईहून रांचीसाठी निघालेली इंडिगोची फ्लाइट क्रमांक-६-ई ५०९३, त्यात देवानंद आणि त्याचा मुलगा होता. रात्री ८.१० वाजता विमान रांचीला पोहोचणार होते. हे विमान रुग्णाला उतरवल्यानंतर काही वेळाने रांचीकडे निघाले.