गोंदिया : एक ट्रक भाड्याने घेऊन त्या ट्रकमध्ये ३५ टन सुपारी टाकून ती सुपारी आसाम येथून राष्ट्रीय महामार्गाने मुंबई येथे नेत असताना तो ट्रक देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर बेपत्ता झाला.ही घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.याप्रकरणी तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.आसाम राज्याच्या कछहार जिल्ह्यातील वॉर्ड क्रमांक १२ पब्लिक स्कूल रोड सिलचर येथील ओमप्रकाश राजकुमार दुबे (३९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे.

शुभम ट्रेडींग कंपनीची ३५ टन सुपारी आसाम येथून वासी मुंबई येथे पाठवायची होती. त्यासाठी ट्रक क्रमांक सीजी ०८ ए.व्ही. ७८५८ भाडे तत्त्वावर घेऊन त्यात ३५ टन सुपारी टाकून आसाम वरून मुंबई नेत असताना तो ट्रक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सीमा तपासणी नाका शिरपूर (देवरी) येथे आला. परंतु तो ट्रक पुढे गेलाच नाही.

हेही वाचा…अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम

त्या ट्रकमध्ये ५२ लाख ३६ हजार ८७५ रुपयांची सुपारी होती. देवरीच्या शिरपूर येथील सीमा तपासणी नाका परिसरातून ११ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता सुपारीचा ट्रक बेपत्ता झाला. या ट्रकचा चालक दिलशाह अली इर्शाद अली (३४) रा. मतीया इमालीदंड लचिपूर ता. राणीगंज जि. प्रतापगड (उत्तर प्रदेश) तर ट्रक मालक राजभूषण मनोहर वैद्य (३९) रा. कनेरी ता. सडक-अर्जुनी हे दोघेही ट्रकमधील ३५ टन सुपारी घेऊन पसार झाले. राजभूषण वैद्य याचा फोन बंद येत आहे. ओमप्रकाश दुबे यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीवर देवरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (३) ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा…चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपास सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ११ पानटपरी चालकांवर गुन्हा दाखल गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा पोलिसांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांवर कारवाई केली आहे.१२ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ११ आरोपींवर सिगारेट व तंबाखूजन्य कायदा कलम ६ (ख) २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव येथील तुकडोजी विद्यानिकेतन हायस्कूल जवळ रियाज कादर खान (४५), रिसामा येथील अजय नरसिंह चौरसिया (४२), किडंगीपार येथील रुस्तम लक्ष्मण चोरवाडे (२८) , हिरालाल बुधराम करंडे (५४), महेंद्र ग्यानिराम हत्तीमारे (४०, रा. जवरी), चिरचाळबांध येथील ताराचंद मानाजी भांडारकर (७३) , दिलीप पन्नालाल मरैय्या (४४), उमेश रामचंद्र भावे (३४) , फुक्कीमेटा येथील लता जीवनलाल भोंडे (३६) व गोविंदराव कवडी पवनकर (४५), पानगाव येथील अशोक हंसराज नागपुरे (२७)यांच्या जवळून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहे.