नागपूर : भारतात मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. त्यावरून अबू आझमी यांनी टीका केली. मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांचे झाले की त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे अधिकार आहेत. लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार आहे. पण, त्यांना लग्नाचा अधिकार नाही. म्हणजे लैंगिक संबंध ठेवू शकता, पण लग्न करू शकत नाही, अशी विचित्र स्थिती यामुळे निर्माण होणार आहे, अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केली.

कायद्यात दुरुस्ती करून मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या संसदीय समितीकडे हा विषय गेला आहे. समितीला मे २०२४ पर्यत देण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले, भाजपचे आमदार नितेश राणे दररोज द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. असे वक्तव्य भाजपाचे इतरही नेते करीत असतात. कडक कायदा करून अशा लोकांना शिक्षा झाल्यास ५० टक्क्यांनी कायदा-सुव्यवस्था सुधारेल, असा दावा अबू आझमी यांनी केला.

हेही वाचा…मुलींच्या शाळेत पुरुषांना नोकरी नाकारणे चुकीचे, वाचा न्यायालय काय म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आझमी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. द्वेषपूर्ण वक्तव्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. अशा लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तक्रारींची देखील आवश्यकता नाही. पोलिसांना स्वत:हून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु पोलीस देखील सत्ताधाऱ्यांपुढे हतबल आहेत. देशात हिंदू-मुस्लीम युवक-युवतींचे पूर्वीपासून लग्न होत आहेत. पण, भाजप नेते अशा लग्नांना “लव्ह जिहाद” संबोधून द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे , असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे उपस्थित होते.