Inspirational Story / नागपूर : प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आत्मविश्वासाने आपले ध्येय साध्य करण्याच यशस्वी झालेली माया पापळकर या अंध तरुणीची कहानी सर्वांना प्रेरणा देणारी ठरली आहे.

पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या वज्जर (अचलपूर तालुका) अनाथालयात लहानाची मोठी झालेली माला आता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून सरकारी सेवेत रुजू झाली. कठोर मेहनत आणि शिक्षणाची आवड या जोरावर एक अनाथ मुलीचा सरकारी सेवेपर्यंतचा प्रवास सर्वांना प्रेरणादेणारा ठरला आहे.

माला अनात आहे, ती एका रेल्वे स्थानकावर बेवारसस्थितीत सापडली होती. निराधार मुलांसाठी आश्रम चालवणारे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्याकडे तिला आणण्यात आले. त्यांनीच तिला माला हे नाव दिले. अंध असल्याने तिने ब्रेललिपीतून शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली . सरकारी सेवेत रुजू झाल्यावर माला म्हणते “ बाबांनी मला आत्मविश्वास दिला, त्यामुळेच मी येथ पर्यंत येऊ शकले” २०२१ मध्ये तिने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

परीक्षेच्या दरम्यान शारीरिक अडचणीमुळे तिला लेखक देण्यात आला. तिच्या परिश्रमालायश आले. तिची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती झाली. यावेळी शंकरबाबा पापळकर उपस्थित होते. ते म्हणाले , “बांबूपासून बासरी तयार करताना त्याला छिद्र करावे लागते, पण त्यातून सुंदर असे स्वर निघतात. त्याच प्रमाणे जीवन सुंदर आहे. दु:खाच्या स्थितीतही आनंदाचे क्षण अनुभवायला येते. मालाआज जेथे आहे तो एक चमत्कारच आहे. पण हा विजय केवळ तिचा व्यक्तिगत नाही तर समाजाचाही आहे.

भारतात अनाथांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली असली तरी अजून बराच टप्पा बाकी आहे. मालाची महसूल सहाय्यकपदी नियुक्ती ही भारतात अनाथांच्या पुनर्वसन प्रणालीत मैलाचा दगड ठरेल.