कर्नल अभय पटवर्धन यांचे प्रतिपादन; व्हिएतनाम युद्धावरील पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : व्हिएतनाम युद्धावर आजतागायत एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही मराठी पुस्तके उपलब्ध नाहीत. अशावेळी सुभाष कौशिककर या झपाटलेल्या माणसाने हा विडा केवळ उचललाच नाही, तर तो लक्षणीयरित्या प्रत्यक्षात आणून मराठी वाङ्मयात एका लक्षणीय युद्ध पुस्तकाची भर घातली असल्याचे मत कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.

सुभाष कौशिककर यांनी लिहिलेल्या व्हिएतनाम : स्वातंत्र्यासाठी सतत ४५ वर्षे युद्धरत राहू  या पुस्तकाचे प्रकाशन कर्नल अभय पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमाला प्रकाशक मकरंद कुळकर्णी,

मुग्धा पटवर्धन, लेखक सुभाष कौशीककर व अभया कौशीककर उपस्थित होत्या. या पुस्तकाला प्रस्तावाना कर्नल अभय पटवर्धन यांची आहे. सुभाष कौशिककरांनी  पुस्तकासाठी संकलित केलेले छायाचित्र आणि प्रचंड मोठय़ा सामाजिक/राजकीय माहितीवरून त्यांनी पुस्तकासाठी घेतलेल्या कष्टांची कल्पना करता येते. माणूस एका संकल्पनेने मनस्वीरित्या झपाटला गेला की अशी ऊर्जा प्रत्ययाला येते. सुभाष कौशिककरांची ही अवस्था मी काही प्रमाणात अनुभवली आहे. त्यांच्या या प्रांजळ; पण प्रखर भावनेतून हे पुस्तक प्रत्यक्षात आल्यामुळे, ते वाचनीय व संग्रहणीय झाले आहे असेही कर्नल पटवर्धन म्हणाले.