आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना जिल्हा नियोजन समितीचे काय कळते?; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका|aditya thackeray criticism by bjp chandrashekhar bawankule ajit pawar uddhav thackeray bhagatsinh koshyari nagpur | Loksatta

“आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना….”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

शिवसेना संपण्यासाठी संजय राऊत बोलतात, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची काळजी घ्यावी, कोणावरही टीका करतांना आपले कर्तृत्व पाहून बोलावे, असे बावनकुळे म्हणाले.

“आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना….”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
चंद्रशेखर बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर टीका

नागपूर: आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ आहे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून काय विकास होऊ शकतो, हे त्यांना माहीत नाही, अशी टीका भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली. बावनकुळे सोमवारी दुपारी नागपुरात आले असता माध्यमंशी बोलत होते.

अजितदादा सोबत राज्यपालांची भेट केव्हा झाली असा प्रश्न उपस्थित करत काही तरी राज्यपालांबद्दल प्रसार माध्यमांना खोटे सांगणे चुकीचे आहे. अजित पवार असे बोलून त्यांची उंची कमी करत आहेत, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी भान ठेवून बोलले पाहिजे असे बावनकुळे म्हणाले. राज्यपालांसारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीबद्दल महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गलिच्छ वातावरण निर्माण करून त्यांची बदनामी केली जात आहे.

हेही वाचा: सावधान..!‘भलत्याच’ संकेतस्थळांवर मुलींचे फोटो होतात अपलोड, ‘डीपी’वर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी

उदयनराजेंची जी काही भूमिका असेल ती ते मांडतील. कोणीही राज्यपालांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केलं नाही. उद्धव ठाकरेंना जे बोलायचे ते सामना या मुखपत्रातून ते बोलत असतात, प्रत्येकाच्या आपल्या भावना असतात ते त्या पद्धतीने वागतात त्यावर टीका करणे योग्य नाही असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सुषमा अंधारे यांना फक्त बोलण्यासाठी ठेवले आहे, शिवसेना संपण्यासाठी संजय राऊत बोलतात, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची काळजी घ्यावी, कोणावरही टीका करतांना आपले कर्तृत्व पाहून बोलावे, असे बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:14 IST
Next Story
सावधान..!‘भलत्याच’ संकेतस्थळांवर मुलींचे फोटो होतात अपलोड, ‘डीपी’वर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी