राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. सरकारमध्ये गद्दार नेते बनले आहेत. गद्दारांचे घोटाळे बघता स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे चित्र राज्यात दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

हेही वाचा >>> बुलढाणा: युवा शेतकरी शेतात काम करत होता, अचानक अस्वलाने….

विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील गद्दार मंत्र्यांवर केवळ भ्रष्टाचाराचे आरोपच नव्हे तर पुरावे सुद्धा आहे. सर्व कागदपत्र जनतेसमोर आहे. हे सरकार अनैतिक आहे. सत्ताधाऱ्यांना काही शरम नाही. ती असती तर भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढून टाकले असते. राज्यात रोज नवा घोटाळा समोर येतोय. हे गद्दारांच्याच गोटातून येत आहे. ४० गद्दारांतून मंत्री बनलेले घोटाळेबाज यांची हकालपट्टी करायला हवी.

मुंबईत आम्ही आहोत, केंद्रशासित करण्याची हिंमत नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैतिक सरकार व त्यातील घोटाळेबाज मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, चौकशीला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु, प्रत्यक्षात कुणामध्येही राजीनामा देण्याची हिंमत नाही. निवडणुकीला सामोरही जाण्यास कोणी हिंमत करू शकत नाही. मुंबई केंद्रशासित करण्याची कोणाची हिंमत नाही. कारण आम्ही येथे असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.