नागपूर: रस्ते, उड्डाण पूल, भुयारी मार्ग बांधकामामुळे ज्या गडकरींचे नाव देशपातळीवर झाले,’ रोडकरी’ अशी त्यांना ओळख मिळाली त्याच गडकरींच्या नागपूर शहरात आता सिमेंट रस्त्याला विरोध होऊ लागला आहे. शंकरनगरमधील नारिकांनी महापालिका बांधत असलेल्या नागरी वस्त्यांमधील सिमेंट रस्त्याला विरोध केला आहे. आमदाराला बोलावून त्यानी या रस्त्याची गरजच काय? असा थेट सवाल केला आहे. या विरोधाला कारणीभूत ठरला तो नुकताच आलेला महापूर.

२३ सप्टेंबरला नागपूरमध्ये नाल्यांना पूर आला. रस्ते उंच असल्यामुळे त्यावरील पाणी लोकांच्या घरात शिरले. त्यामुळे लोक सिमेंट रस्त्याला विरोध करीत आहेत. शंकरनगर वस्तीतील प्रस्तावित ५०० मीटर अंतर्गत सिमेंट रस्त्याला या भागातील नागरिकाचा तीव्र विरोध आहे. या रस्त्यामुळे भविष्यातील पावसचे पाणी आपल्या घरात भरण्याची भीती त्यांना आहे. त्यानी या भागाचे आमदार आमदार विकास ठाकरे यांना फोन करून तेथे सिमेंट रस्ता बांधण्याची गरज काय, असा सवाल केला. 

हेही वाचा >>> “भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी”; सुषमा अंधारे यांची प्रखर टीका, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरांपेक्षा जास्त उंचीवर रस्ता तयार केला जात आहे. त्यामुळे मुसळधार पावसात घरांमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे, असे रहिवाशांनी ठाकरे यांना सांगितले. “आमच्या आतल्या गल्ल्यांमध्ये सिमेंट रस्त्याची खरोखर गरज आहे का? “जर हाच विकास आहे, तर आम्हाला तो नको आहे,” अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली. महापालिकेने रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी रहिवाशांचा सल्ला घ्यायला हवा होता, असे ते म्हणाले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसाळ्यात खराब नाल्यांमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. आता उंचावरील रस्ता समस्या आणखी वाढवेल, असे स्थानिकांनी सांगितले. ठाकरे यांनी महापालिकेचे अभियंता आणि ठेकेदाराला काम थांबविण्यास सांगितले.