नागपूर:विदर्भातील १० जिल्ह्यातील अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता सुरुवात झाली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर या ठिकाणी ही निवड प्रक्रिया होत आहे. पावसामुळे काही वेळ ही चाचणी थांबली होती. या वेळेत सर्व उमेदवार मानकापूर येथील क्रीडा संकुलाच्या इन्डोअर स्टेडियममध्ये थांबले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनात सैन्य दलासोबत प्रशासनाने उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा या ठिकाणी बहाल केल्या आहेत.

हेही वाचा : धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत दररोज रात्री बारापासून ही निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडांगणावर होणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराला आवश्यक वेळापत्रक देण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आजपासून या निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी दिली आहे.