सैन्यदलातील अग्निवीर भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे. यासाठी विदर्भातील दहा जिल्ह्यातील (बुलढाणा जिल्हा वगळून) तरुणांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १५ मार्चपर्यंत तरुणांना यासाठी नोंदणी करता येणार आहे. यावेळी या प्रक्रियेत थोडा बदल करण्यात आला आहे. आता प्रथम  लेखी परीक्षा घेतली जाईल व त्यात उत्तीर्ण झालेल्यांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व सैन्यदल भरती अधिकारी जे. नारायण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा >>> ‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ , गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर

अग्निवीर भरतीसाठी १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पाच हजार तरुणांनी नोंदणी केली. १५ मार्चपर्यंत  नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी भरतीसाठी नोंदणी करावी, म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहे. १७  एप्रिल ते ४ मे दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. २० मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जुलै ते ११ जुलै या दरम्यान अग्निवीर भरती मेळावा होईल. यात यशस्वी झालेल्या तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. मागच्या वेळी विदर्भातील सरासरी ६० हजार रुण अग्निवीरभरती मेळाव्यात हभागी जाले होते.त्यापैकी हजार तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. काही तरुण निवड होईनही प्रशिक्षणासाठी आले नव्हते, असे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा >>> ‘राजश्री शाहू’चा रक्तदान शिबीर पंधरवडा , राज्यात ७५ ठिकाणी आयोजन, एक हजार बाटल्या संकलनाचे उद्दिष्ट

ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी असून कोणीही अफवा किंवा अमिषाला बळी पडू नका.कोणी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवले तर त्यापासून दूर रहा, असे आवाहन डॉ. इटनकर यानी यावेळी सांगितले.