नागपूर : एका कंपनीच्या विमानासाठी हवाई सुंदरी असलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये नेऊन प्रियकराने बलात्कार केला. तिला ‘न्यूड फोटो’ समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या पतीलाही अनैतिक संबंधाबाबत सांगण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनिष वेणूधर बुरडकर (३३, साईनगर, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित २३ वर्षीय तरुणी हवाईसुंदरी आहे. आरोपी प्रियकर मनिष बुरडकर हा अभियंता असून दोघेही पूर्वी एका खासगी कंपनीत आर्किटेक म्हणून नोकरीला होते. यादरम्यान, कार्यालयातच दोघांची मैत्री झाली. काही दिवसांतच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने प्रेयसीला एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी देण्याच्या आमिषाने नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिला अविवाहित असल्याचे सांगून लग्न करण्याचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२१ पासून दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला असता तो वारंवार टाळाटाळ करीत होता. त्यामुळे प्रेयसीला संशय आला. ती मार्च २०२२ अचानक मनिषच्या घरी गेली. तिला घरात मनिषची पत्नी आणि मुलगा दिसला. तिने मैत्रिण असल्याची ओळख दिली आणि निघून गेली. मनिषला जाब विचारला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे ती नैराश्यात गेली.

हेही वाचा – गुजरात-महाराष्ट्रात क्रिकेट सट्टेबाजीसाठी ‘अ‍ॅप’चा सर्वाधिक वापर

हेही वाचा – आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचे अखेर आदेश, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्न झाल्यावर शारीरिक संबंधाची मागणी

प्रियकर मनिषने धोका दिल्यानंतर प्रेयसी हवाईसुंदरी म्हणून नोकरीवर लागली. तिने एका नातेवाईक तरुणाशी लग्न केले. मात्र, विवाहित प्रेयसीला मनिष वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिचे नग्न छायाचित्र इंस्टाग्रामवर प्रसारित करण्यासह पतीला पाठविण्याची धमकी दिली. तिने पतीशी या विषयावर चर्चा केली. तिच्या पतीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकर मनिषचा शोध सुरू केला आहे.
………….