नागपूर: महाविकास आघाडीचा मोर्च्याला नॅनो मोर्चा’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चावर टीका केली. या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडूनही खोचक उत्तर देण्यात आले. नागपुरात सोमवारपासून सुरू होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी पवार यांचे शनिवारी रात्री नागपुरात आगमन झाले.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला आम्ही फार महत्त्व देत नाही, उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो नाव ठेवावं की स्कुटर नाव ठेवावं, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्या गोष्टीला फार महत्त्व देत नाही”, असे अजित पवारांनी म्हणाले.
मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलकांना पैसे देण्यात आल्याचा आरोप पवार यांनी फेटाळला.

हेही वाचा: ‘नॅनो मोर्चा’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “दिल्लीश्वरांनी गुंगीचं औषध…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीची पहिलीच बैठक साधारण सोमवारी होईल. त्यावेळेस उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे सगळे उपस्थित राहतील असा आमचा प्रयत्न आहेत सरकारच्या चहापानच्या कार्यक्रमात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं उत्तर दिले