नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पुढील पाच-सहा महिन्यात होण्याची शक्यता असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागपूर शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मध्य नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

मध्य नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार)चे अध्यक्ष रवी पराते यांच्यासह सुमारे १०० पदाधिकारी, कार्यकर्ते माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात आले आहेत.

एका कार्यक्रमात शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, प्रदेश सचिव कमलेश समर्थ,प्रशांत धवड, शहर उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे, वसीम खान, ॲड. अभय रणदिवे, आप्पा मोहीते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर काॅग्रेस कार्यालयात झालेल्या सभेत राष्टवादी काॅग्रेस पार्टी (अजीत पवार) गटाचे मध्य नागपूरचे अध्यक्ष रवी पराते यांनी १०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काॅग्रेस पक्षाच्या विचारधाने प्रेरित होवून शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते काॅग्रेस पक्षाचा दुपटटा स्वीकारुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तसेच रवी पराते यांनी आपला सखोल राजकीय आणि सामाजिक कार्याच्या अनुभवातून भविष्यात मध्य नागपूर तसेच शहर काॅग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्याकरिता कार्य करण्याचा मानस व्यक्त करुन निर्धार केला.

यावेळी शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले काॅग्रेस पक्ष हा महात्मा गांधीच्या काळापासून असून या देशाला स्वतंत्र मिळून देण्याकरीता मोलाचे योगदान दिलेले आहे. तसेच नवीन पिढीची दिशाभूल करुन २०१४ पासून भाजपची एक हाती सत्ता असून देखील काँग्रेसची मताधिक्य वाढलेले आहे.

अनेक वस्त्यामध्ये पानी, दिवे, गडर लाईन यांची दुरावस्था आहे. सरकारी पैशाचा जनसामान्याच्या गरजेच्या गोष्टीकरीता खर्च केला असता तर नागपूरचे चित्र वेगळे असते. समोर नागपूर महापालिका आहे मध्य नागपूर मध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याकरीता पक्ष संघटना तसेच जनमानसाचे प्रश्न काॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोडवावे असे आव्हान त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देश महासचिव अतुल कोटेचा म्हणाले, काँग्रेस पक्षात रवी परातेचा प्रवेश म्हणजे सेतू बनविण्याचे काम होय. आज आमदार विकास ठाकरे यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. नक्कीच महापालिकेमध्ये काॅग्रेसचा झेंडा फडकविण्याचे काम करतील. त्यांना मदत करण्यास आम्ही सर्व कटिबध्द आहोत.