अकोला : दक्षिण व पश्चिम भारताला जोडणाऱ्या दोन विशेष गाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने राजकोट – महबूबनगर आणि ओखा – मदुराई या मार्गांदरम्यान विशेष भाड्याने उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.

उत्सावातील भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील अकोला स्थानकावरून धावणाऱ्या दोन गाड्यांचा समावेश आहे. गाडी क्रमांक ०९५७५ /०९५७६ राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट – महबूबनगर विशेष गाडी ३ ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक सोमवार रोजी राजकोट येथून १३.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता महबूबनगर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९५७६ महबूबनगर – राजकोट विशेष गाडी ४ ते २५ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक मंगळवार रोजी महबूबनगर येथून रात्री २३.०० वाजता सुटेल व गुरुवारी पहाटे ०५.०० वाजता राजकोट येथे पोहोचेल. या गाडीला वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड़, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचीगुडा, शादनगर व जडचर्ला येथे थांबा राहील. या गाडीत द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित, स्लीपर व सामान्य वर्गाचे डबे असतील.

ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०९५२० ओखा – मदुराई विशेष गाडी ३ ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक सोमवार रोजी ओखा येथून २२.०० वाजता सुटेल व गुरुवारी सकाळी ११.४० वाजता मदुराई येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९५१९ मदुराई – ओखा विशेष गाडी ७ ते २८ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार रोजी मदुराई येथून ४ वाजता सुटेल व रविवारी १०.२० वाजता ओखा येथे पोहोचेल. ही गाडी द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, उधना, नंदुरबार, आमलनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, हजूर साहेब नांदेड़, निजामाबाद, काचीगुडा, महबूबनगर, डोन, गूटी, रेनीगुंटा, काटपाडी, वेल्लोर कँटोनमेंट, तिरुवन्नामलाई, विलूपुरम, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली, मणप्पारै, डिंडीगुल व कोडाईकनाल रोड रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. या गाडीत द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित, शयनश्रेणी व सामान्य वर्गाचे डबे असतील. प्रवाशांनी या विशेष सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या विशेष गाड्यांमुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना विशेष सुविधा होणार आहे.