नागपूर : राज्यातील ‘हॉटसीट’पैकी एक असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार देवेंद्र फडणवीस सलग चौथ्यांदा विजयी होणार की काँग्रेसचा परिवर्तन पर्वाचा नारा देत प्रफुल्ल गुडधे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील या दोघांनीही प्रचारात संपूर्ण ताकद झोकल्यामुळे ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रचाराकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे फडणवीस स्वत: ‘दक्षिण-पश्चिम’मध्ये अधिक वेळ देऊ शकले नाहीत, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी ही उणीव भरून काढली. दुसरीकडे, गुडधे पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक भाग स्वत: पिंजून काढला.

हेही वाचा…जय भीम म्हटल्याने ‘या’ नेत्याची मंत्रीपदाची संधी हुकली ?

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दरदिवशी त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर दिला. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रचार विकासक्रेंद्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसच्यावतीने मूलभूत सुविधा आणि संविधान या विषयावर आधारित प्रचार करण्यात आला. दक्षिण-पश्चिममध्ये निवडणुकीच्या रिंगणात एकूण बारा उमेदवार आहेत. मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार असली तरी ‘वंचित’ आणि ‘बसप’च्यावतीने लढा देण्याचा प्रयत्न होत आहे. या मतदारसंघात दलित मतांची संख्याही महत्त्वपूर्ण असल्याने या पक्षांना किती मते मिळतात ही देखील महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे.