अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात करण्‍यात आलेल्‍या पायाभूत कामांमुळे गेल्‍या १० नोव्‍हेंबरपासून एकूण १० प्रवासी गाड्या या इगतपुरी ते बडनेरापर्यंतचे ५२६ किलोमीटरचे अंतर प्रतितास १३० किलोमीटरच्‍या वेगाने धावत आहेत. यापुर्वी इगतपुरी ते बडनेरा या मार्गावर १२० किमी प्रतितास वेगाने रेल्‍वेगाड्या धावत होत्‍या. आता पहिल्‍या टप्‍प्‍यात १० गाड्यांचा वेग १० किमी प्रतितास इतका वाढला आहे.

हेही वाचा : नागपुरात दिवसभर उत्साह अन् रात्री निराशा; भारतीय संघाच्या विश्वचषक पराभवाने क्रिकेटप्रेमीचा हिरमोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई- अमरावती एक्‍स्‍प्रेस, अमरावती-मुंबई एक्‍स्‍प्रेस, नागपूर-सीएसएमटी एक्‍स्‍प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्‍स्‍प्रेस, सीएसएमटी-नागपूर एक्‍सप्रेस, सीएसएमटी-हावडा एक्‍स्‍प्रेस, गोंदिया-सीएसएमटी एक्‍स्‍प्रेस, सीएसएमटी-गोंदिया एक्‍स्‍प्रेस, या रेल्‍वेगाड्या इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा सेक्‍शनमधील ५२६.६५ किमी अंतर प्रतितास १३० या वेगाने धावतात. यामुळे या गाड्या नियोजित वेळेआधी रेल्‍वेस्‍थानकांवर पोहोचतात. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचतो. आगामी काळात या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.