नागपूर : अभियांत्रिकीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीने वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी सुनील भावेकर (२०, रा. प्रियदर्शनी मुलींचे वसतिगृह, हिंगणा टी-पॉईंट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी भावेकर ही मूळची धामनगाव रेल्वे, अमरावती येथील असून तिचे वडील शिक्षक आहेत. ती नागपुरात अभियांत्रिकेच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. दोन मैत्रिणींसह एकाच खोलीत राहत होती. तिचा ३० एप्रिलला निकाल लागला. ती तीन विषयांत नापास झाली तर दोन्ही मैत्रिणी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्या दोघीही पास झाल्यामुळे पार्टीला निघून गेल्या. गौरी नापास झाल्याने नैराश्यात गेली. तिने वडिलांना फोन केला आणि तीन विषयांत नापास झाल्यामुळे निराश असल्याचे सांगितले.

हेही वाचा – भंडारा : लग्न समारंभात फटाक्यांची आतिषबाजी तीन वऱ्हाडींना भोवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या वडिलांनी तिची समूजत घातली आणि पुन्हा प्रयत्न कर आणि यश मिळव, असा सल्ला दिला. मात्र, तिचे मन मानत नव्हते. आईवडिलांना एकुलती असलेल्या गौरीने अखेर गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दोन्ही मैत्रिणी खोलीवर परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.