नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ संबधित विविध संघटनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची विदर्भ प्रांत बैठक रेशीमबाग स्मृती भवनमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा – Buldhana Accident : करुणांत! थिबकलेले अश्रू अन् अंत्यसंस्काराची असह्य प्रतीक्षा, आप्त स्मशानभूमीत…

यामध्ये भाजपाचे स्थानिक प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले आहेत. भाजपाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर आणि संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, दीपक तामशेट्टीवार यांच्या नेतृत्वात ही समन्वय बैठक होत असून, या बैठकीमध्ये प्रत्येक संघटन त्यांच्या कामाचा आढावा सादर करणार आहेत. तसेच पुढील वर्षाच्या कामाच्या नियोजनावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते.