वर्धा : २५० गावांत फिरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला आज माजी मंत्री अनिल देशमुख यांनी हिरवी झेंडी दिली. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये पोहोचून पक्षाचा संदेश दिला जाणार आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटनीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वातील या यात्रेस पोहणा येथील हेमाडपंथी शंकर मंदिरात अभिषेक करून प्रारंभ झाला. २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान ही यात्रा चालणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना अनिल देशमुख म्हणाले की, जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. हे चित्र बदलायचे असेल तर आगामी निवडणुकीत परिवर्तन झालेच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – चंद्रपूर : राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा बल्लारपूरच्या क्रीडा संकुलात, २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजन

या परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. पुढे त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करू. यात्रेदरम्यान सर्व पदाधिकारी विविध गावांत शाळा किंवा मंदिरात मुक्काम करतील, असे प्रतिपादन वांदिले यांनी केले. आरोग्याचा प्रश्न या मतदारसंघात बिकट होत चालला आहे. अनेक गावांत दवाखाने नाही. दवाखाने आहेत तर डॉक्टर नाही. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्षच नसल्याचा आरोप वांदिले यांनी केला.

हेही वाचा – बुलढाणा : श्रीक्षेत्र माकोडी येथे खोपडी बारस सोहळ्याचा शुभारंभ; तीन दिवस भरगच्च कार्यक्रम, श्रीहरी महाराजांची उपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश उपाध्यक्ष किशोर माथनकर, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, सरचिटनीस दशरथ ठाकरे, सरपंच नामदेवराव राऊत, ओंकारजी मानकर, डॉ. दिवाकर वानखेडे, नीलकंठ कटारिया, पंकज भट्ट, जगदीश वांदिले, अमोल राऊत, गजू महाकळकर, सुमित बारापत्रे, डॉ. वर्मा, जावेद मिर्झा, प्रशांत घवघवे, सुनील भुते, मोहन मसालकर व अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.