नागपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना ईडी आणि सीबीआयने तुरुंगात टाकले, परंतु आरोपाचे पुरावे देत आले नाही. न्यायालयाने कडक ताशेर या दोन्ही तपास यंत्रणांवर ओढले आणि जामीन मंजूर केला.
हेही वाचा – पदवीधर, शिक्षकमधील पराभवानंतर भाजपाची महापालिकेसाठी ‘वॉर रूम’
दरम्यान मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिह यांच्या खोट्या तक्रावरून अनिल देशमुख यांना जवळपास २१ महिने तुरुंगात राहावे लागले, तसेच समाजात बदनामी झाली. अनिल देशमुख यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. त्यांनी न्यायालयाला मुंबई बाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने ती विनंती मान्य केली. देशमुख आज शनिवारी नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शहरात पोस्टर लावले आहेत. सोबतच डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी एक लाख पत्रक वाटण्यात येणार आहे. या पत्रकात संपूर्ण घटनाक्रम आहे आणि खोटे आरोप करून तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचे म्हटले आले.