प्रख्यात क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या टेनविक स्पोर्ट्स या कंपनीने येथील ‘ई चन्नावार’ संस्थेच्या अल्फा ड्रीम्स स्पोर्ट्स अकादमी या संस्थेशी करार करीत ग्रामीण भागात राष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार करण्याचा विडा उचलला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

आशिष झोडे व प्रा.दिनेश चांनावार यांनी हा करार करताना स्पष्ट केले की प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळण्यासाठी संस्थेच्या क्रीडा सुविधा अद्ययावत करण्याचे ठरले. त्यासाठी विविध नामांकित क्रीडा अकादमीचा शोध घेतला. कुंबळे यांच्या कंपनीचे नाव अग्रेसर असल्याचे दिसून आल्यानंतर आम्ही कुंबळे यांच्याशीच चर्चा केली. त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांच्या कंपनीचे वसंत भारद्वाज हे भेट देण्यासाठी आले व त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे चन्नावार म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत

कुंबळेंची टेनविक कंपनी ही गत तेरा वर्षांपासून मुलांच्या खेळातील रुचीला प्रोत्साहन देत आहे. देशातील शंभर शाळांमध्ये पन्नास हजारावर मुलांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. भारद्वाज म्हणाले. इथे फुटबॉल, क्रिकेट व बॅडमिंटन या खेळाचे प्रशिक्षण एप्रिलपासून सुरू होणार आहे. शहरात प्रथमच अशी संधी उपलब्ध झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kumble tenwick sports company ties up with e channawar pmd 64 amy
First published on: 14-03-2023 at 12:23 IST