गोंदिया : नागपूरहून ते गोंदियाला जाणाऱ्या शिवशाही बसचा शुक्रवारी अपघातात झाला होता. त्यात ११ प्रवाशांचा मृत्यू आणि सुमारे २० प्रवासी जखमी झाले होते. या घटनेची शाही वाळत नाही तोच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातून चिचगडकडे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जात असलेल्या साकोली आगाराच्या साकोली ते केशोरी जाणाऱ्या मानव विकासच्या निळ्या एस .टी.बस क्रमांक एम.एच.४० ए. क्यू. ६०५० चा अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ही बस रिकामी असल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. दररोजच्या प्रमाणे आज शनिवार सकाळची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना घेण्याकरिता जात असलेल्या एस.टी. बस ही ३० नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी चिचगड कडे जात असताना अब्दुलटोला ता. देवरी गावाजवळ एका दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बस वरून नियंत्रण सुटले आणी बस सरळ रस्त्याचा कडेला खाली उतरली दरम्यान सकाळ च्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी याची माहिती जवळील गावकऱ्याना व पोलिसांना दिली.

देवरी पोलिसांनी व गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत वाहक मंजुषा लांजेवार आणी चालक हिवराज वासुदेव मडावी यांना देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात चालक हिवराज आणी वाहक मंजुषा किरकोळ जखमी झाले आहेत. तर विशेष बाब म्हणजे कालच शुक्रवारी गोंदिया कोहमारा रोडवर शिवशाही एस.टी बस चा अपघात झाला असता ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर २० प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. असे असताना आज शनिवारी सकाळी पुन्हा एकदा एस. टी. बस चा अपघात घडल्याने या पुढे एस.टी. बस मध्ये प्रवास करावे की नाही असा प्रश्न मानव विकासच्या बसमधून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी आणी इतराना पडला आहे.

हेही वाचा : विजयानंतरही शिंदे गटाचे संजय गायकवाड व्यथित; म्हणाले, “प्रतापराव जाधव, संजय कुटे यांनी काम केलेच नाही!…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज शनिवारी साकोली आगारातून साकोली ते केशोरीला जात असलेल्या मानव विकासच्या एस.टी. बस चा किरकोळ अपघात सकाळी झाला आहे. चालक आणि वाहक दोघांना किरकोळ जखम झालेली असून दोघांना उपचाराकरिता देवळी ग्रामीण रुग्णालयात गावकऱ्यांनी नेले होते उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आलेली असल्याची माहिती साकोली आगाराचे उईके यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली.