नागपूर : राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या वक्तव्यावर मलमपट्टी लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसची आरक्षणाबाबतची भूमिका महाराष्ट्र आणि देशासमोर आली आहे, अशी टीका उद्योेगमंत्री उदय सामंत यांनी केली.

उदय सामंत नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता येईल असे स्वप्न काँग्रेस पाहत असली तरी स्वप्न बघायला पैसे लागत नाही. त्यांनी स्वप्न बघत राहावे. मात्र त्यापूर्वी राज्यातून व देशातून काँग्रेसची सत्ता का गेली याचे, त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. त्यावर देखील खुलासा केला पाहिजे. काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका महाराष्ट्र आणि देशासमोर आली आहे. झालेले नुकसान कमी करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण जनतेची दिशाभूल करीत आहेत. मात्र आता जनतेला लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने दिलेली खोटी आश्वासने बघून या पक्षावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

हे ही वाचा…बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…

जागा वाटपाबाबत तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली असून ८० टक्के जागा वाटप झाले आहे. यादी कधी जाहीर होईल याबद्दल माहिती नाही. महाविकास आघाडीच्या अगोदर आम्ही चर्चेला सुरुवात केली आणि राज्यातील जवळपास ८० टक्के जागा निश्चित केल्या आहेत. महायुतीत कुठलीही रस्सीखेच नाही. तिन्ही पक्षाच्या लोकांमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल, असा विश्वास असल्याचे सामंत म्हणाले.

आनंद दिघे यांच्या आश्रमात पैशे उधळण्याचे कृत्य जर कोणी करत असेल त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. त्याचा हेतू काय होता हे देखील समोर आला पाहिजे असेही सामंत म्हणाले. एन एम ग्लोबल कोलवॉशरी संदर्भात तक्रार आली तर नक्कीच उद्योग मंत्री म्हणून त्याची चौकशी केली जाईल. त्यात तथा आढळो तर कारवाई सुद्धा होईल, अशी ग्वाही या चर्चेदरम्यान उदय सामंत यांनी दिली.

हे ही वाचा…“मी बैलासारखा काम करेन,” काँग्रेस खासदाराचे आश्वासन अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाहीमध्ये अपक्ष माणसाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पक्षाच्या माणसाला देखील तोच अधिकार आहे. कुणी इच्छा व्यक्त करत असेल तर त्यात काही गैर नाही. इच्छुकांनी फलक लावले म्हणून तिकीट वाटप केले जाणार नाही. उमेदवार ठरविण्याचा अधिकार हा तीनही पक्षातील प्रमुख नेते एकत्र मिळून करणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.