भंडारा : गेल्या चार वर्षांपासून भंडारा नगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून सुमारे वीस कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे टेंडर घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करीत डॉ. परिणय फुके यांनी सदर कामाच्या निविदा रद्द केल्या.
त्यांनी म्हटले आहे की, प्रशासकीय मान्यता न घेता २०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आणि एका नेत्याने या कामांमधून २० टक्के कमिशन घेतले. त्यांच्या या विधानामुळे भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे असून २० टक्के कमिशन घेणारा नेता कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री पंकज भोयर यांचे उपस्थितीत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पूर्ण फुके यांनी असे खळबळ जनक वक्तव्य करून आगामी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
डॉ. फुके म्हणाले की, एका राजकारण्याने प्रशासकीय मंजुरीशिवाय २०० कोटी रुपयांची निविदा काढली, काम आपापसात वाटून घेतले आणि २० टक्के कमिशनही घेतले. राज्यमंत्री पंकज भोयर यांना ही बाब कळताच त्यांनी तात्काळ निविदा रद्द केल्या. अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
मागील चार वर्षांत भंडारा नगरपरिषदेत कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, भंडारा शहरातील २५ ते ३० टक्के विकास निधी भ्रष्टाचारात वाया गेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त विकास सुनिश्चित करण्यासाठी भाजपचा अध्यक्ष आणि नगर परिषदेचा नगरसेवक निवडणे अत्यावश्यक आहे. डॉ. फुके यांच्या भाषणाने भंडारामध्ये राजकीय हालचालींना उधाण आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर झपाट्याने देशात व राज्यात विकास होताना दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या चार नगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यास केंद्र व राज्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील चारही नगर पालिकांचा विकास करू, असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर , माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितित कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार सुधाकर जी कोहळे, माजी खासदर् मधुकर कुकडे, माजी खासदार सुनील मेंढे, भाजप भंडारा जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाणे, भंडारा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी जिल्हा अध्यक्ष शिवराम गिऱ्हिपुंजे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विवेक नखाते, उल्हास फडके, भाऊराव तुमसरे, भंडारा जिल्हा भाजप युवामोर्चा अध्यक्ष सचिन बोपचे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा माहेश्वरी नेवारे, अनुसुचित जाती मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष दिनेश वासनिक, अनुसुचित जमाती मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष अशोक उईके, किसान मोर्चचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डिम्मु शेख, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, कल्याणी निखारे, भगवान चांदेवार, कांचन गहाणे, विनोद ठाकरे, जॅकी रावलानी, विनोद बांते, भगवान बावणकर, गज्जू यादव, भंडारा ग्रामीण तालुका अध्यक्ष संदीप मेश्राम तसेच अन्य मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
