नागपूर : मागील सहा वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतिगृहांचा विषय शासनाने अजूनही सोडवलेला नाही. राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग अजूनही याबाबत गंभीर दिसत नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहू शकतात, असा आरोप करीत या विरोधात गुरुवारी रेशीमबाग चौक येथे सकाळी १० वाजता भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – पाच मित्रांची यशोगाथा! एकत्र अभ्यास केला अन् एकाच वेळी एमपीएससीच्या दोन परीक्षेत घवघवीत यश

हेही वाचा – अद्भूत! टॅबलेट, कॅप्सूलपासून साकारले गणराय, मोताळ्यातील ‘फार्मासिस्ट’ची अनोखी कलाकृती; दर्शनासाठी भाविकांची रीघ

यावेळी शासन पैशाची अडचण सांगत असल्याने भीक मागून पैसे गोळा करत सरकारचा निषेध करण्यात आला. उमेश कोर्राम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. शाळा महाविद्यालये सुरू होऊन ३ महिने उलटले आहेत. तरी ७२०० विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृहे, २१६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, ७५ विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना सुरू झाली नाही. वरील योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत. यासाठी या आंदोलनातून गोळा झालेला पैसा शासनाच्या वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागास पाठविण्यात येणार आहे.

Story img Loader