नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांची, तर रामटेकच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपूर : जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा मतदारसंघासोबतच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात काटोल मतदारसंघासाठी चरणसिंग ठाकूर, साधनेरसाठी डॉ. राजीव पोतदार, हिंगणा नरेश चरडे, उमरेड – सुधीर पारवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी किशोर वानखेडे, दक्षिण मतदारसंघासाठी संजय ठाकरे, पूर्व नागपूर मतदारसंघासाठी प्रमोद पेंडके, मध्य नागपूर बंडू राऊत, पश्चिमसाठी संदीप जाधव, तर उत्तर नागपूर मतदारसंघात गिरीश व्यास, कामठी मतदारसंघात अजय बोढारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.