नागपूर : अल्पवयीन मुलीला लैंगिक हेतूने स्पर्श करणे किंवा लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने त्या मुलीला जवळ घेणे हा प्रकार सुद्धा पाेक्साे कायद्याअंतर्गत बलात्काराच्या श्रेणीत मो़डतो, असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. अशाप्रकरणात चुकीने स्पर्श झाला असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरता येत नाही, असेही न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आणि आरोपीला सत्र न्यायालयाने दिलेली दहा वर्षाची शिक्षा कायम ठेवली.

आराेपी हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रहिवासी असून व्यवसायाने ताे ड्रायव्हर आहे. आराेपीने दाेन अल्पवयीन मुलींना पेरु देण्याचे आमिष दाखवून घरी बाेलावले. त्यांना मांडीवर बसवून पेरु खाऊ घातले. त्याने मुलींशी अश्लील वर्तनसुद्धा केले. मात्र, पेरु खाण्यात मग्न असलेल्या मुलींनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर भ्रमणध्वनीवर कार्टून दाखविण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ आणि महिलांचे नग्न चित्र दाखवले. मुलींच्या गुप्तांगाला स्पर्श केला तसेच मुलींशी लैंगिक भावना आणि उद्देश ठेवून अश्लील चाळे केले. आठवड्याभरानंतर दाेन्ही मुलींनी घरी आपल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आईवडिलांनी त्या ड्रायव्हरची पाेलिसांत तक्रार केली. पाेलिसांनी पाेक्साे आणि भारतीय दंड संहिता कलम ३७६(२)(ळ) तसेच ५११ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. मात्र आराेपीने याचिकेत दावा केला हाेता की, हा खटला काैटुंबिक वादातून निर्माण करण्यात आला आहे. मी प्रेमाने दाेन्ही मुलींना जवळ घेतले हाेते. त्यात काेणतेही लैंगिक वर्तन नव्हते, असा दावा आराेपीने केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

गैरसमजातून गुन्हा असल्याचा दावा

आराेपीने आपल्या याचिकेत दावा केला हाेता की, हा खटला काैटुंबिक वादातून निर्माण करण्यात आला आहे. माझा चुकीने मुलींच्या गुप्तांगाला स्पर्श झाला हाेता. मी प्रेमाने दाेन्ही मुलींना जवळ घेतले हाेते. त्यात काेणतेही लैंगिक वर्तन नव्हते, असा दावा आराेपीने केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेेटाळून लावला. न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले की,पाेक्साे कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा घटनेच्या वेळी लागू असलेल्या नियमांनुसार ठरवली जावी. २०१९ मध्ये झालेल्या दुरुस्तीप्रमाणे या गुन्ह्यासाठी किमान वीस वर्षांची शिक्षा आहे, तरीसुद्धा न्यायालयाने या प्रकरणात दहा वर्षांची सक्तमजुरी याेग्य ठरवली आहे. हा निर्णय लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ’लैंगिक हेतूने केलेला स्पर्श देखील बलात्कार मानला जाऊ शकताे’ या कायदेशीर व्याख्येला नवी ओळख मिळू शकेल. तसेच कायद्याचा वचक कायम राहणार आहे.