अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) नवनवीन विभाग वाढत असतानाच आता मूत्रपिंड प्रत्यारोपणही सुरू झाले आहे. तीन दिवसांत येथे दोन मूत्रपिंड प्रत्यारोपण आहे. गुरुवारी प्रथमच मेंदूमृत रुग्णाच्या मूत्रपिंडाचे येथील एका रुग्णात प्रत्यारोपण झाले.

सीमा वाघमारे (४८) रा. जरीपटका असे अवयवदान करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सीमाला तनया (१२) आणि जान्हवी (१०) नावाच्या दोन मुली असून तिच्या पतीचे नाव सुरेंद्र आहे. ३ मे रोजी सीमाची प्रकृती अचानक खालावली. तिला सिम्स रुग्णालयात दाखल केले गेले. मेंदूत रक्तस्त्राव असल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ९ मे रोजी तिचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. कुटुंबीयांनी अवयव प्रत्यारोपणासाठी परवानगी दिल्यावर सीमाला एम्समध्ये हलवण्यात आले.

हेही वाचा >>> भंडारा : पिसाळलेल्या श्वानांचा पाच जणांना चावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे ११ मे रोजी प्रतीक्षा यादीतील नागपुरातील ५१ वर्षीय पुरुष रुग्णात हे मूत्रपिंड प्रत्यारोपित केले गेले. दुसरे मूत्रपिंड केअर रुग्णालय तर यकृत किंग्ज वे रुग्णालयातील रुग्णात प्रत्यारोपित केले गेले. एम्समध्ये ९ मे रोजी वडिलांनी मुलाला मूत्रपिंड दाण केले होते. ही पहिली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जिवंत दात्याकडून मूत्रपिंड घेऊन केली गेली होती. ११ मे रोजी मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून पहिली शस्त्रक्रियाही येथे यशस्वी झाली. या प्रत्यारोपणासाठी १० मेच्या रात्रीपासून एम्सचे संचालक डॉ. हनुमंता राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्यासह एम्सच्या चमूने अथक प्रयत्न घेतले. यशस्वी प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते आणि अवयव प्रत्यारोपण समितीची भूमिका महत्त्वाची ठरली.