विवाहितेच्या छळप्रकरणी लोणार पोलिसांनी शिक्षक असलेल्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचे विवाहित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, तक्रारकर्त्या महिलेचे १९९६ मध्ये उर्दू शाळेतील शिक्षकासोबत विधिवत लग्न झाले असून तिला एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.
वर्धा : घरकुलाच्या नावाखाली श्रमिकांची फसवणूक
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
“लोणार पालिकेच्या उर्दू कन्या शाळेत कार्यरत पती शमीम अहमद तस्लिम हुसेन हा सध्या आमच्या सोबत राहत नसून तो आणि सासरची मंडळी माझा छळ करीत आहे. मागील काळात माझ्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न देखील झाला. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याने व मी ‘तलाक’ द्यावा यासाठी माझा छळ करण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.” यावरून चौघांविरुद्ध कलम ४९८-अ, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.